1917 : रेस अगेंस्ट टाईम

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
23 Jan 2020 - 3:09 pm

90च्या दशकातल्या तरुणांना कॉल ऑफ ड्युटी ww 1 हा गेम माहितीच असेल. इंग्लंड-अमेरिकेच्या अँगल ने तयार केलेल्या या गेम मध्ये जर्मनांना हरवण्यासाठी वेगवेगळे मिशन दिले असतात आणि ते आपल्याला पूर्ण करण्याचे असतात.  सॅम मेंडिस चा 1917 पहिल्या महायुद्धातल्या अश्याच एका मिशन वर आधारित आहे.फ्रान्समध्ये असलेल्या ब्रिटिश सेनेतल्या 2 तरुणांना दुसऱ्या आघाडीवरच्या असलेल्या ट्रूप्स ला एक महत्वाचा संदेश वेळेत पोचवायचा आदेश दिला जातो, त्यांच्या सोबतीला आहे अदृश्य रूपातले लपून बसलेला शत्रू, काटेरी कुंपण, पाण्याने भरलेली दलदल, कुजलेले मृतदेह.  तो संदेश वेळेत पोचवण्यासाठी ते 'नो मॅन्स लँड' मधून शत्रूला चुकवून जो प्रवास करतात त्याची साधी कथा म्हणजे '1917'. या साध्या कथेला अप्रतिम सिनेमॅटोग्राफीची जोड दिल्याने 2 तासांची फक्कड व्हिज्युअल ट्रीट आहे.  1917 चा सध्या बोलबाला झाला तो याच्या कॅमेरा वर्क साठी.  सिनेमॅटोग्राफर 'Roger Deakins' चा हिरो सोबत चिखल, मैदान, ट्रेंच मधून पळणारा कॅमेरा कुठेही तुटक पणा जाणवू देत नाही आणि खिळवून ठेवतो. त्यामुळेच जेव्हा मध्यांतर होते तेव्हा ते नकोसं वाटतं, इतकं प्रेक्षक कॅमेरामुळे त्या कथेशी एकरूप झालेले असतात.

वर्ल्ड वॉर मुव्ही म्हंटला की त्याची 'सेविंग प्रायव्हेट रायन' सोबत तुलना होणं अटळ आहे. त्यामुळेकथेच्या दृष्टीने पहायला गेलं तर थोडी सेविंग प्रायव्हेट रायन च्या जवळपास जाणारी कथा आहे असं मला वाटतं. पण सेविंग प्रायव्हेट रायन इतकी प्रभावी वाटत नाही, कारण ही 1917 ची कथा बरीचशी सोबर करून दाखवली आहे, सेविंग मध्ये जे युद्ध दिसतं, वन टू वन सिन दिसतात तसंच सगळं इथे सुद्धा आहे, पण बरचसं मिळमिळीत. युद्धाची दाहकता दाखवण्यात 1917 कुठेतरी कमी पडतो. पण सिनेमॅटोग्राफीने मुव्ही पार उंचावर नेवून ती उणीव भरून काढली आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी संदर्भाला जोडून आहे, उदाहरण द्यायचं झालं तर त्यात दाखवलेला भारतीय शिख सैनिक, पहिल्या महायुद्धात बरेच भारतीय इंग्लंड कडून लढले त्या शिख सैनिकांचा समावेश करून हि गोष्ट सॅम मेंडिस ने नेमकेपणाने टिपली आहे.

खरंतर 'रेस अगेंस्ट टाईम' असलेली हि कथा मस्ट वॉच आहे, पण IMAX मध्येच। लॅपटॉप,मोबाईलवर त्यातल्या कन्टीन्यूअस कॅमेरा शॉट्सची मजा तशीच येईल हे सांगता येत नाही.

1917 imdb

नाट्यइतिहासचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमतशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

23 Jan 2020 - 3:18 pm | श्वेता२४

.

प्रसाद_१९८२'s picture

23 Jan 2020 - 4:11 pm | प्रसाद_१९८२

चित्रपट ओळख आवडली.
--
१९१७ मधे डिजीटल रिस्ट वॉचचा शोध लागला होता का ?
कारण ह्या चित्रपटात काही सैनिकांच्या हातावर ते घड्याळ बांधलेले दिसले.

मराठी कथालेखक's picture

28 Jan 2020 - 3:37 pm | मराठी कथालेखक

हिंदीमध्ये पण आलाय का ?