नौसैनिकांची चलाखी

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

नौसैनिकांची चलाखी

नौदलात काम करत असताना अनेक हुशार आणि चलाख नौसैनिकांबरोबर काम करण्याचा प्रसंग आला. सैन्याची कोणतीही शाखा म्हटली की शौर्य, शिस्त, उत्तम निर्णयक्षमता इत्यादी गुणांचे अधिकारी व सैनिक सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येतात. सैन्यातील कडक शिस्त तर सुपरिचित आहे, पण सैन्यदलातही शेवटी तुमच्या-आमच्यातीलच व्यक्ती काम करतात ना? तर, अशा व्यक्तींकडून कधी कधी मजेशीर, चलाख किस्सेही घडतात. त्यातील काही निवडक किस्से -

१.
मी विक्रांतवर असताना एकदा किनाऱ्यावरील कार्यालयातून फोन आला. आमच्या शिक्षण विभागाच्या एका नौसैनिकाने तो उचलला. तिकडून आवाज आला, "रंधावा स्पीकिंग."
याने विचारले. "अबे, तू लिडिंग है या पेटी ऑफिसर (म्हणजे नाईक की हवालदार)?"
त्यावर तिकडून आवाज आला, "आय एम कमांडर रंधावा स्पीकिंग."
हा प्रसंगावधान राखून म्हणाला, "देन से सो (असं नीट सांग)" आणि त्याने फोन ठेवून दिला. पण त्यानंतर त्याला घाम फुटला. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला (लेफ्टनंट कमांडर बांगा यांना) हा प्रसंग सांगितला.
बांगा सर त्याला म्हणाले, "तू त्यांना आपले नाव सांगितले आहेस का?"
तो म्हणाला, "नाही."
त्यावर बांगा सर म्हणाले, "मग तू फोन उचललाच नाहीस. जा घरी."

२.
मी तटरक्षक दलातील वज्र या जहाजावर होतो. तेथे घडलेली ही कहाणी -
जहाजावर चढण्यासाठी एक जिना असतो, तेथे लोकांचे ओळखपत्र तपासायला आणि तपासणी करायला आणि सलाम करण्यासाठी तैनात असलेल्या नौसैनिकाला 'क्वार्टर मास्टर' म्हणतात.

https://indianembassy-moscow.gov.in/images/gallery/INS-TARKASH-1.jpg

तेथे भंवर सिंग नावाचा एक नौसैनिक तैनात होता. त्याने एक मुलगी पटवली होती. तिला घेऊन तो जहाज दाखवायला आला होता. जहाजावर चढण्यासाठी जिना असतो, त्याच्या बाजूला मी उभा होतो. त्याने मला पाहिलेले नव्हते. तो आपल्या मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगत होता, "मला या नंबरवर कधीही फोन कर आणि क्वार्टर मास्टर बी सिंग ला बोलवा असे सांग. ते मला बोलावतील. सध्या मी क्वार्टर मास्टर आहे. पुढच्या वर्षी मी हाफ मास्टर होईन आणि आणखी दोन वर्षांनी मी फुल मास्टर होईन." हे ऎकून मी अवाकच झालो. जहाजाच्या आत येऊन इतर अधिकाऱ्यांना सांगितले आणि तेथे हास्यकल्लोळ झाला.

३.
विक्रांतवर असताना एक पद्धत होती - १२०० सैनिक असत, त्यामुळे तेथे तुमचा कोणीही पाहुणा जहाज पाहायला आला, तर त्या दिवशी असलेला गणवेश घालून त्यांना जहाज दाखवायला लागते. इंजीन रूममध्ये असलेल्या एका नौसैनिकाने आपल्या मैत्रिणीला विक्रांत दाखवायला आणले होते. तेथे त्याने इंजीन रूमसाठी असलेला गणवेश घातलेला होता. **** नौसैनिकांना एकतर निळा किंवा खाकी गणवेश (डांगरी किंवा बॉयलर सूट म्हणतात तो) असे आणि अधिकार्‍यांना पांढरा बॉयलर सूट. (त्यामुळे अधिकारी कोण आणि सैनिक कोण, हे लगेच समजत असे.) यात गणवेशावर डावीकडे आपले नाव आणि हुद्दा (rank) लिहिलेला असे आणि उजवीकडे रक्तगट.

910

त्याची मैत्रीण एकंदर विक्रांतचा आकार आणि तेथील विमाने वगैरे पाहून भलतीच इम्प्रेस झालेली होती. तिला आता हा इंजीन रूम दाखवायला घेऊन गेला. इंजीन रूममध्ये माझा मित्र पियुष शर्मा तैनात होता.

हा सैनिक हुद्द्याप्रमाणे ME १ - म्हणजे मेकॅनिक इंजीन रूम प्रथम वर्ग होता. त्याने खाकी बॉयलर सूटचा गणवेश घातला होता. त्याच्या मैत्रिणीने हे छातीवर लिहिलेले ME १ वाचून विचारले की "हे ME १ म्हणजे काय?"
त्याने टेचात सांगितले की "मेकॅनिकल इंजीनियर फर्स्ट क्लास." त्यानंतर ME २ खाकी बॉयलर सूटच्या गणवेशामध्ये असलेला एक आणखी कनिष्ठ नौसैनिक आला. तिने विचारले, "हा कोण आहे?" याने सांगितले, "हा आणखी कनिष्ठ (YOUNGSTER) आहे. मेकॅनिकल इंजीनियर सेकंड क्लास."

इंजीन रूम पाहत असताना एक तिसरा नौसैनिक आला. LME (LEADING MECHANIC ENGINEROOM). याने मैत्रिणीला सांगितले, "हे आमचे वरिष्ठ आहेत, लिडिंग मेकॅनिकल इंजीनियर."
तिथे फिरत फिरत ही मुलगी पियुष शर्माच्या कन्सोलजवळ आली आणि तिने याला पांढऱ्या बॉयलर सूटमध्ये पाहिले.

पुढे जाता जात तिने याला विचारले, "हे पांढऱ्या सूटमध्ये का आहेत?"
त्यावर हे महाशय हजरजबाबीपणे उद्गारले, "आज तो आजारी आहे, म्हणून पांढऱ्या बॉयलर सूटमध्ये आहे."

पियुष शर्मा अवाक झाला. वर वार्डरूममध्ये येऊन मला सांगत होता, "डॉक्टर, बघ आपले नौसैनिक कसे आहेत. मैत्रिणीवर इम्प्रेशन पेरायला मला आजारी पाडले त्याने."

मी हसत पियुषला म्हणालो, "प्रेमात आणि युद्धात सगळे क्षम्य असते."

४.
सैनिक आपल्या कुटुंबापासून महिनोनमहिने लांब राहतात. त्यातून त्यांचे कार्याचे तास कितीही असत, शिवाय इंजीन रूमसारख्या ठिकाणी भयंकर गरम असे. परंतु सैनिकांना विक्रांत जहाजावर दारू पिण्याची मनाई असे. त्यांना कूपरेजजवळ सैनिकांचा क्लब आहे तेथे बार आणि चखणा याची सोय असे. परंतु ज्या सैनिकांची ड्युटी रात्री ७ वाजता संपली पाहिजे, त्यांना बऱ्याच वेळा काम आटोपेपर्यंत नऊ-साडेनऊपर्यंत उशीर होत असे, त्याला तेथे पोहोचेपर्यंत उशीर होत असे आणि तो बार तर साडेनऊला बंद होत असे. मग हे सैनिक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत. बरेच लोक थम्स अपच्या/कोकाकोलाच्या बाटलीत रम किंवा स्प्राइटच्या/सेव्हन अपच्या बाटलीत व्होडका भरून ठेवत. रात्रीच्या जेवणात असलेला सामिष पदार्थ बाजूला काढून ठेवून किंवा बाहेरून खारे शेंगदाणे वेफर्स विकत आणून हे लोक गपचुप आपल्या लॉकरमध्ये ठेवत.

मी सॅनिटरी राउंडला जात असे, त्यात सैनिकांची निवासस्थानेसुद्धा तपासणे हा माझ्या कार्याचा एक भाग असे. जहाजात उंदीर फार होत असल्यामुळे अशा गोष्टींना (खाद्य पदार्थांना) खरे तर परवानगी नसे. शिवाय जहाजावर कायम गस्त चालू असे, त्यामुळे तेथे सैनिकांजवळ बंदुका आणि जिवंत काडतुसे असत, म्हणून दारू पिण्याचीही परवानगी नव्हती. मी त्यांना ताकीद देत असे, परंतु मी कोणावरही काही कार्यवाही कधीच केली नाही.
एकाने नवरतन तेलाची बाटली आतून स्वच्छ करून घेतली होती, पण बाहेरून मात्र नवरतन तेलाचा वास तसाच ठेवण्याची खबरदारी घेतली होती. त्यात त्याने रम भरलेली होती. अर्थात ते मझ्या लगेच लक्षात आले, कारण तेलाची आणि रमची घनता आणि चिकटपणा वेगळे असतात. अर्थात मी केवळ हसून पुढे गेलो आणि जाता जाता त्याला म्हणालो, "मैं बहुत कुछ जानता हूँ. आपके लॉकरमें फ्राइड प्रॉन्स भी भरे है ये भी मैं उसकी गंधसे पहचान चुका हूँ! ठीक है! लेकिन कभी आप दारू पीके ड्युटी पर पकडे गये, तब तुम्हारी खैर नही होगी!"

त्यानेही हसून सलाम ठोकला आणि म्हणाला, "सर, दिनभर इंजीन रूम मी गर्मी में काम करके थक गया हूँ! दोस्तोके साथ थोडी देर बात करके दो पेग पीके शांती से सोना है, और कुछ नही!" मी केवळ हसलो.

५.
विक्रांत या अवाढव्य विमानवाहू जहाजावर मी एकटाच वैद्यकीय अधिकारी होतो. जवळजवळ १००० नौसैनिकांच्या एकंदर आरोग्याची जबाबदारी माझ्यावर होती. हे सर्व सैनिक जेव्हा जेव्हा सुटीवर जात, तेव्हा त्यांना कोणता संसर्गजन्य लैंगिक आजार नाही/ तो पूर्ण बरा झाला आहे याची खातरी करूनच पाठवले जाते. त्यामुळे यांच्या सुटीच्या अर्जावर वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आवश्यक असते.

१९९०-९१ या काळात भ्रमणध्वनीच काय, साधे दूरध्वनीसुद्धा दुर्मीळ होते. त्यामुळे सैनिकांच्या ख्यालीखुशालीसाठी पत्र हा एक मोठा दुवा होता आणि त्वरेने संपर्कासाठी तार करणे हा उपाय होता. घरी कोणी आजारी, अत्यवस्थ असले, तर तेव्हा तार पाठवत. अशी तार आली की सैनिक तातडीने सुटीवर जात/पाठवले जात असत.

राजस्थानातील झुंझुनू गावचा असाच एक सैनिक बिजेंदर सिंह माझ्याकडे तातडीने सुटीसाठी सही करण्यासाठी अर्ज घेऊन आला होता. त्याला मी तातडीचे कारण विचारले, तर त्याने "MOTHER SERIOUS" अशी तार दाखवली. मी काही न बोलता अर्जावर सही केली आणि तो सुटी वर गेला.
साधारण एक महिन्याने मी फ्लाइट डेक वर फिरत असताना बिजेंदर सिंह दिसला. मी त्याच्याकडे पहिले तर मला आठवले की हा तर MOTHER SERIOUS म्हणून तातडीने सुटीवर गेला होता.

मी त्याला विचारले, "तुझी आई कशी आहे?"

त्यावर तो म्हणाला, "ती ठणठणीत आहे. तिला काय झालंय?"

मग मी विचारले, "तू सुटीवर कशाला गेला होतास?"

त्यावर तो म्हणाला, "सर, लग्न करायला गेलो होतो."

मी त्याला म्हणालो, "तू तर MOTHER SERIOUS अशी तार घेऊन आला होतास ना?"

त्यावर तो ओशाळवाणे हसून म्हणाला, "सर, वो तो MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE होतं."
मी हसलो आणि परत फिरलो.

आहे त्या परिस्थितीत आपला कार्यभाग साधण्यासाठी नौसैनिक चलाखी करतात, हे मी अनेक वेळेस पाहिलेले होते. बहुतेक वेळेस तुम्ही त्यांच्या चलाखीचे कौतुक केले, तर तेसुद्धा तुमच्या खिलाडू वृत्तीचा आदर ठेवतात, असे मी पाहिले आहे.

शेवटी तीसुद्धा आपल्यासारखीच बऱ्या-वाईट भावना असणारी माणसे असतात. केवळ काळे किंवा पांढरे असे असून चालत नाही. प्रेमात पडलेले सैनिक आपल्या मैत्रिणींना अचाट आणि अफाट थापा मारताना दिसत असत, परंतु एक तर खाजगी आयुष्यात किती पडायचे हा एक मुद्दा आहे आणि शेवटी प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य आहे. आणि इथे तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असताना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाच्या हिरवळीवर का उगाच आग पाखडा?

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

https://www.jagranimages.com/images/18_05_2019-test-fire_19233207_132340947.jpg

https://i.redd.it/rnfgq0h05r711.jpg

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

विनटूविन's picture

26 Oct 2019 - 2:31 pm | विनटूविन

मस्त अनुभव
वाचायला मजा आली.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 2:56 pm | पाषाणभेद

तुमच्या चांगूलपणाचा ते गैरफायदा तर घेत नसत?

सुबोध खरे's picture

31 Oct 2019 - 8:41 pm | सुबोध खरे

तुमच्या चांगूलपणाचा ते गैरफायदा तर घेत नसत?

काही वेळेस सुक्या बरोबर ओलं हि जळतं.

उदा. एखाद्याने आपल्याला "डायरिया" झालाय असं सांगितलं तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणे भाग असते. सामान्य पणे डॉक्टर रुग्णांवर विश्वास ठेवतातच. यात रुग्णाची नदी जीभ इ पाहून त्याला किती त्रास होतोत हे समजून येते परंतु बऱ्याच वेळेस रुग्णाला "संशयाचा फायदा" दिला जातो

परंतु दुसऱ्या दिवशी परेड असली कि बऱ्याच जणांना "डायरिया (हगवण)" होतो मग अशा माणसाला शौचाची तपासणी करायची आहे म्हणून आपल्या रुग्णालयात भरती करून घेतले कि संध्याकाळी घरी जायला मिळणार नाही असे इतरांना पण लक्षात येते शिवाय तपासणीसाठी शौच द्यायचे तर ते व्हायला तर पाहिजे.
एकदा हा डॉक्टर "हुशार" आहे समजले कि परेडच्या आदल्या दिवशी असे रुग्ण एकदम कमी होतात.

एकदा इन्स्पेक्शन च्या अगोदर वज्र या जहाजावर एका शेंडी लावू पाहणाऱ्या नौसैनिकाला मी तुला आता इंजेक्शन देणार आहे. त्याने जर तुला खरंच डायरिया झाला असेल तर तो थांबेल ( सात वेळेस जात असशील तर ते एकदाच होईल परंतु खरंच डायरिया नसेल तर तुला सात दिवस शौचाला होणार नाही असे सांगितले(
(अर्थात खरा डायरिया नसेल तर फार तर दोन तीन दिवस शौचास होणार नाही सात दिवस नव्हे) त्यावर तो मी "इन्स्पेक्शनला जाईन" म्हणून तयार झाला होता.

हि कथा जहाजभर पसरली होंती ( कॅप्टन ने माझे अभिनंदन हि केले होते)

अन त्यानंतर माझ्याकडे उगाच डायरिया झाला म्हणून कोणीही आले नाही.

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 3:08 pm | जेम्स वांड

आमच्या व्हाईट कॉलर आयुष्याला फार वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवता आहात डॉक्टर साहेब बोहोत खूब, ह्या सगळ्या गोष्टी जश्या सुपरहिरो फिल्म्स मध्ये परिस्थितीजन्य विनोदी प्रसंग असतात तसे वाटतात मला, थँक यु फॉर युवर सर्विस सर.

सध्या मी क्वार्टर मास्टर आहे. पुढच्या वर्षी मी हाफ मास्टर होईन आणि आणखी दोन वर्षांनी मी फुल मास्टर होईन."

मला एकदम भीती वाटली, मैं अभी क्वार्टर हु फिर हाफ साईज हो जाऊंगा फिर फुल खंबा हो जाऊंगा असं काही तर म्हणत नाहीये तो हिरो नौसैनिक हा हा हा हा

Big Smile

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:56 pm | यशोधरा

मजेशीर अनुभव.

खटपट्या's picture

26 Oct 2019 - 9:35 pm | खटपट्या

मस्त किस्से

शाम भागवत's picture

27 Oct 2019 - 2:44 pm | शाम भागवत

मस्त.

हरिहर's picture

28 Oct 2019 - 12:37 pm | हरिहर

MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE
हा हा हा
मस्त लेख

शशिकांत ओक's picture

28 Oct 2019 - 1:51 pm | शशिकांत ओक

वाचताना मजा आली...

जॉनविक्क's picture

28 Oct 2019 - 3:31 pm | जॉनविक्क

किस्सा क्रमांक

1) खतरा.

2) फुल मास्टर दोन वर्षात ? तो तर आत्ताच एक फुल एक हाफ मास्टर असल्याप्रमाणे बोलत होता की :)

3) धन्यवाद, यापुढे आजारी नौसैनिक ओळखण्यात अजिबात चूक होणार नाही माझ्याकडून.

4) हम्म, काही अनुचित घडत नाही का कधी ?

5) रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे मात्र खरे

मजा आली, खासगी आयुष्यात बरेच चलाख आहेत की हे लोकं ;) अर्थात यांच्याच प्रामाणिकपणा सचोटीमुळे आज आपण विस्तीर्ण समुद्र मार्गाचे जागरूक पहारेकरी आहोत हेही खरेच त्यांच्या सेवेला सदैव सलाम.

सुबोध खरे's picture

31 Oct 2019 - 8:51 pm | सुबोध खरे

हम्म, काही अनुचित घडत नाही का कधी ?

असं होतं काही वेळेस कारण झिंगे(प्रॉन्स) कपाटात ठेवले तर ते खराब होऊ शकतात आणि त्यामुळे सैनिकाचे पोट बिघडते. पण त्याला झालेला त्रास अगोदरच भरपूर असल्याने या गोष्टी डॉक्टर "वरपर्यंत" नेत नाहीत.

बहुतेक लष्करी डॉक्टर इतर अधिकाऱ्यांपेक्षा जास्त कनवाळू असतात शिवाय डॉक्टर हा सहसा हडेलहप्पी करणारा नसव अशी अपेक्षा असते.(आणि तशी बऱ्याच वेळेस गरज असते कारण सैनिकांचे म्हणणे ऐकून घेणारा सुद्धा कोणीतरी असावा लागतो.) म्हणूनच जहाजात डॉक्टर हा कल्याण अधिकारी (WEFARE OFFICER) पण असतो.
यामुळेच अनेकदा सैनिक नियमाविरुद्ध काम करत असला तरी डॉक्टर त्याच्याकडे काणा डोळा करतात.

फारच भारी लेख. वेगळ्याच जगाचं दर्शन. धन्यवाद.. !!

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 4:59 pm | सोत्रि

:) :) :)

- (एकेकाळी खलाशी व्हायची हौस असलेला) सोकाजी

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 5:25 pm | किल्लेदार

चटपटीत किस्से... मजा आली

खलाशी लोकांनी बरीच "मखलाशी" केलेली दिसते.

मीअपर्णा's picture

31 Oct 2019 - 3:28 am | मीअपर्णा

MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE वाचून मजा वाटली.
तुमच्याकडची अनुभवाची पोतडी वाचायला नेहमी आवडते. :)

चाणक्य's picture

31 Oct 2019 - 11:18 am | चाणक्य

MOTHER SERIOUS वाला किस्सा भारीये. तुमचे अनुभव वाचायला नेहमीच मजा येते.

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:26 pm | समीरसूर

नेहमीप्रमाणेच सुरेख अनुभव! आपल्या अनुभवांच्या कक्षा खूप निराळ्या आणि अफाट आहेत. आणि आपले लिखाण तर उत्कृष्ट असतेच… :-)

मुक्त विहारि's picture

1 Nov 2019 - 7:49 am | मुक्त विहारि

अनुभव आवडले...

तुमचे मजेशीर अनुभव वाचायला मजा आली!
धन्यवाद.

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 7:48 pm | श्वेता२४

गंमतीशीर प्रसंग त्याचबरोबर तुमचे नौसैनिकांशी कनवाळू असणे मनाला स्पर्षून गेले.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 10:52 pm | मुक्त विहारि

आवडले

जॉनविक्क's picture

22 Nov 2019 - 10:52 pm | जॉनविक्क

युद्धकथा असावी या अपेक्षेने धागा उघडला होता, पण डॉक्टर साहेबही अतिशय चलाख निघाले.

- (चलाख नसलेला) जॉन विक्क.

कुमार१'s picture

22 Nov 2019 - 8:49 pm | कुमार१

मस्त किस्से.

टीकोजीराव's picture

22 Nov 2019 - 9:06 pm | टीकोजीराव

भारी किस्से, आवडले.

Nitin Palkar's picture

18 Mar 2020 - 8:00 pm | Nitin Palkar

अतिशय रंजक.