मिपा दिवाळी अंक २०१९
जपून ठेवलेत तारे!

आपली दुःखे लपवून सतत हसत राहणाऱ्या, मुठीतले तारे फुंकून सुखाची पाखर करणाऱ्या जादूगार आणि झुंझार मैत्रिणींना माझा हा मानाचा मुजरा..
शब्दांंवाचून लिहिते गाथा डोळ्यांमधली शाई
झाकले सारे मुठीत ज्या ती मूठ पडो ना उघडी
उगाच उसने पुण्य नको नी व्याजावरती पाप नको
काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली
तहानलेल्या मना शमवण्या सर एखादी बरसावी
मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे..
तिने जपून ठेवलेत तारे...

.png)
प्रतिक्रिया
26 Oct 2019 - 2:07 pm | यशोधरा
जबरदस्त, प्रभावी.
सुंदर लिहिले आहेस सत्या.
30 Oct 2019 - 12:25 am | मनिष
शेकडो टाळ्या स्वीकारा...
30 Oct 2019 - 5:03 am | पद्मावति
अत्यंत सुरेख __/\__
30 Oct 2019 - 8:29 pm | चौकटराजा
कुणीच नसते इथे कुणाचे वेळही नसते आपुली
काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली
तरीही वाटे फुंकर एखादी झुळूक होऊनी यावी
तहानलेल्या मना शमवण्या सर एखादी बरसावी
पहिल्या दोन ओळीत वास्तव व पुढील दोन ओळीतील न संपणारी आशा .....
30 Oct 2019 - 9:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह, सुंदर
31 Oct 2019 - 3:33 pm | ऋतु हिरवा
मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे.....अतिशय सुरेख कल्पना
वा फारच आवडली...
2 Nov 2019 - 5:43 pm | श्वेता२४
सुरेख कविता .खूप भावली
19 Nov 2019 - 2:04 pm | अलकनंदा
वा! फार सुरेख!
अतिशय अचूक निरीक्षणांती लिहिलेली रचना. फार भावली.
19 Nov 2019 - 9:40 pm | गोंधळी
खुपच छान शब्द रचना.