दोन नको देऊ...

राजे १०७'s picture
राजे १०७ in जनातलं, मनातलं
27 Sep 2019 - 8:59 pm

लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात.
सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा.
एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले.
कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं. नंतर
नवऱ्याला काय सांगावे याची
चिंता तिला पडली.
सदुबा घरी आला, कलाबाईला सैपाक झाला की नाही हे विचारले. ती म्हणाली सुरीला धारच नाही. मासे कसे कापणार? सदुबाकडे सुरी दिली. सदुबा सुरी घेऊन मागील दारी धार लावायला गेला. तेवढ्यात गणपा पुढच्या दारी आला. कलाबाई त्याला म्हणाली, भाऊजी जेवण बिवण काही नाही. हे ना तुमचे कान कापून घेणार आहेत. त्यांनी नवस केला होता देवाला माणसाचे कान वाहीन म्हणून. ते पहा चाकूला धार लावत आहे. गणपानं पाहिलं तर खरंच सदुबा चाकूला धार लावत होता.
ते पाहून गणपा घाबरून पळाला. इकडे कलाबाई नवऱ्याला म्हणाली. अहो, अहो तुमचा मित्र मासे घेऊन पळाला . धावा, पकडा. सदुबा तसाच चाकू हातात घेऊन गणपाच्या मागं लागला. धावता धावता अरे दोन नको देऊ एक तरी दे असा आवाज देऊ लागला. इकडं गणपाला वाटलं दोन नको एक तरी कान दे असं म्हणतोय सदुबा. गणपा अजून जोराने धावत सुटला.
संपली माझी गोष्ट.
( कृपया गंमत म्हणून वाचावी.)

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Sep 2019 - 6:24 pm | मुक्त विहारि

छान आहे ही कूटकथा....

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 7:23 pm | राजे १०७

धन्यवाद मुक्त विहारी भाऊ.

जॉनविक्क's picture

29 Sep 2019 - 7:25 pm | जॉनविक्क

आन आकुंची सुद्धा तुम्हाला फार मोठा पल्ला गाठायचाय अजून, लिवते रवो क्लिमिश बौ

राजे १०७'s picture

29 Sep 2019 - 7:57 pm | राजे १०७

शेंबड्या जॉन तुला फक्त कुत्सित प्रतिसाद देता येतात काय? नाकाचा शेंबूड पुसून घे पहिला.