वसंत उत्सव

स्वामि १'s picture
स्वामि १ in जे न देखे रवी...
8 Apr 2019 - 11:27 am

तहान

सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा

संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा

पक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी

सुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी

सुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी

लहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही

त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा

वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....!

वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....!

धन्यवाद

kokanसंस्कृतीकवितातहान

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

4 May 2019 - 3:33 pm | ट्रम्प

उन्हाळ्यात पक्षांची होणारी तगमग तुमच्या लेखनीतून सरसर उतरली आहे .

अभ्या..'s picture

4 May 2019 - 9:32 pm | अभ्या..

ह्याच वर्षी उन्हाळ्यात पक्षांची तगमग आहे हो, दरवर्षी उन्हाळ्यात मात्र पक्ष्याची तगमग होते.

श्वेता२४'s picture

4 May 2019 - 8:49 pm | श्वेता२४

साधी सरळ सुरेख कविता. आवडली.

Rajesh188's picture

4 May 2019 - 8:50 pm | Rajesh188

छान कविता

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2019 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान कविता !

इतकं शुद्ध मराठी लिहिता येतं तर इतर ठिकाणीही जबरदस्तीने अशुद्ध लिहायची गरज काय? (एखादी र्‍ह्स्व-दीर्घाची चूक मिपाकर सहज नजरअंदाज करतील ;) :) )

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 May 2019 - 1:46 pm | बिपीन सुरेश सांगळे

सोप्या शब्दातील सुरेख कविता