ऍव्हेंजर आणि मी..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
22 Apr 2019 - 4:25 pm

ऍव्हेंजर फॅन कोणी आहे का ?
एक प्रश्न आहे गरिबाला...

तो ऍव्हेंजर्स एन्ड गेम सिनेमा आलाय तो एकदम फायनल म्हणायचा का? म्हणजे विषय संपला का एकदाचा?

पुढचं लिहीण्याआधीच सांगतो, वर्षभराने 'ऍव्हेंजर्स उरलंसुरलं' नावाने सिनेमा येणार असल्यास माझी काहीही हरकत नाही. मी ऍव्हेंजर्स विरोधी नाही. आणि मार्व्हल व्हर्सेस डीसी वगैरे फंदात तर मला मुळीच पडायचं नाही. आमच्यालेखी मार्व्हेल, डीसी म्हणजे शिवसेना-मनसे आहेत. म्हणजे एकाला झाका दुसऱ्याला काढा फरक नाही.

असो.
मुद्दा एवढाच आहे की, साधारण अजून किती वर्ष हे बघायचं आहे ह्याचा एक अंदाज घ्यावा म्हटलं.

बाकी ऍव्हेंजरची समीक्षा करण्याची आमची लायकी नाहीच हे जगजाहीर आहे.ह्यांचं सगळंच अवाढव्य आणि माझ्या आकलनशक्ती पलीकडलं ! मी ह्यांचा एक सिनेमा बघितला होता. साहजिकच तो मला कळला नाही. हे शल्य एका मित्राला सांगितल्यावर तो म्हणतो कसा,

"अरे असं कसं समजेल तुला. आधी आयर्न मॅनचे तीन पार्ट बघ. मग थॉरचे तीन पार्ट बघ. त्यानंतर कॅप्टन अमेरिकाचे किमान २ भाग बघायचे. यानंतर एजेस ऑफ अल्ट्रॉन नाही बघितला तरी चालेल पण एन्ट मॅन सोडू नकोस बरं का...मग डॉक्टर स्ट्रेंज बघावाच लागेल..आणि गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी बघितला तर उत्तमच. त्यानंतर हा सिनेमा कळेल तुला"

मी म्हटलं," एवढं बघितल्यावर डॉक्टरेट घरी पाठवतात की परत वेगळा प्रबंध लिहावा लागतो?"

हा विनोद त्याला कळला नसावा. तो तणतणत निघून गेला.

पण त्याच्या सल्ल्यावर उतारा म्हणून मी आपल्या लक्ष्याचा 'झपाटलेला' परत बघून टाकला.
(माझा आत्मा तुझ्यात..तुझा आत्मा बाहेर..ओम फट्ट स्वाहा:.... गॉड डॅमइट...विषय संपला)

मी ह्यांच्या फंदातच पडत नाही. आपण बरे अन आपले झी सिनेमावाले पिच्चर बरे..

आणि मी बघतो त्या हिंदी सिनेमात असतेच काय? सिनेमातला व्हिलन म्हणजे मोहल्ल्यातला एखादा गुंडा किंवा जास्तीत जास्त एखादा राजकारणी. आणि गुन्ह्यांचं स्वरूप म्हणजे खून, मारामारी वगैरे किरकोळ. पण ऍव्हेंजरमधला व्हिलन हा मुळातच पलीकडल्या आकाशगंगेत बसला असतो. तिथून तो आपल्या आकाशगंगेला छळत असतो. मग ऍव्हेंजरचे शूरवीर सेनापती कॅमेरावाला गॉगल आणि लाल-पिवळ्या रंगाची विज फायर करणारी पिस्तूल घेऊन त्या शत्रूला धडा शिकवतात. आणि ही फायटिंगसुद्धा जमिनीवर न होता अंतराळात होते. अडीच तीन तास विजेची बौछार केल्यावर तो शत्रू मरतो.

आणि खरी गम्मत इथून सुरु होते, लढून लढून थकलेल्या सेनापतींना नवीन माहिती मिळते की आपण ज्याला मारला तो खरा शत्रू नव्हे. ज्याला मारले तो तर छुटपूट होता. खरा शत्रू आणखी पलीकडल्या आकाशगंगेत आहे.

मग सगळे सेनापती आपापले गॉगल आणि पिस्तूल चार्जिंगला लावतात आणि पुढल्या सिनेमाची वाट बघतात.

पण सेनापतींच्या शौर्याला खरंच तोड नाही. आजवर आमच्या सनी देओलने गदर सिनेमात जमिनीतून हाताने उखडलेली हापशी म्हणजे आमच्यासाठी शौर्याची परिसीमा होती. पण हे लोकं एका बुक्कीत दोन-चार आकाशगंगा उलट्यापालट्या करून टाकतात राव. मी पाहिलेल्या त्या सिनेमात व्हिलनचं आकारमान साधारण ३०-४० सूर्य मावतील एवढं होतं. तरी तो आयरन मॅन का कोणीतरी साध्या करंगळीच्या जोरावर त्याला लोळवतो. हे पाहिल्यावर सनी देओलने बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर दोरीने ओढत ओढत भारतात आणला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

पण बाकी काही असलं तरी एक गोष्ट मात्र मी खेदानेच नमूद करू इच्छितो. एवढं तांत्रिक पाठबळ असूनही या ऍव्हेंजर्सची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍबिलिटी जरा कमीच आहे. म्हणजे एवढे वीस-बावीस सिनेमे काढूनही यांना अजूनही मूळ समस्या काय आहे तेच कळलेले नाही. ह्यापेक्षा तर आमचे ब्रिगेडीयर सूर्यदेवसिंग बरे. व्हिलनच्या कब्जात असताना मिसाईलवर चढून त्यातले फ्युज कंडक्टर काढून ज्या सहजतेने त्यांनी देशावरचं अणुसंकट टाळलं होतं त्याला तोड नाही. आणि हा पराक्रम करताना कव्हरिंग फायर म्हणून काय वापरावं तर पाईपचा धूर !
असा गनिमी कावा तर साक्षात महाराजांनीही वापरला नाही. म्हणजे सूर्यदेवसिंग जर ऍव्हेंजरमध्ये असते तर, अंतराळाच्या पटलावर एखादं कृष्णविवर वगैरे बांधून शत्रूची आकाशगंगा त्यांनी लगेच गिळंकृत केली असती.
हो !! कृष्णविवर बांधता येते !! एखाद्या ताऱ्याचे फ्युज कंडक्टर काढून सूर्यदेवसिंगांनी ही किमया अगदी आरामात केली असती.

उगाच हसायचं काम नाही भाऊ..पृथ्वीवर सापडणाऱ्या टिटॅनियम धातूपासून बनवलेला सुट जर अंतराळातल्या कुठल्याही वातावरणात तग धरू शकत असेल आणि पिस्तुलातून निघालेली वीज कुठल्याही ग्रह-ताऱ्यावर सारखीच तबाही पसरवत असेल (मग ते रेझिस्टन्स,कंडक्टन्स, इम्पेडन्स गेले तेल लावत!) तर ताऱ्याला फ्युज कंडक्टर असणे सुद्धा शक्य आहे!!

असो.
तर ऍव्हेंजर आवडणाऱ्या लोकांनो,
तुमचं काय ते एकदा फायनल ठरवा आणि सांगा.

तुमचाच,
ऍव्हेंजरचा एक सिनेमा थेटरात जाऊन एकदाही न झोपता पाहिलेला एक सामान्य चाहता.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

माझा मोठा मुलगा प्रचंड चाहता आहे आणि त्यामुळे मीपण हा एन्ड गेम बघणार आहे . काही निगेटिव्ह रिव्यू असेल तर नक्की कळवावे

लई भारी's picture

22 Apr 2019 - 4:42 pm | लई भारी

प्रचंड आवडलं :) साधारण अशीच स्थिती आहे आमचीपण.

(माझा आत्मा तुझ्यात..तुझा आत्मा बाहेर..ओम फट्ट स्वाहा:.... गॉड डॅमइट...विषय संपला)

असं साधं-सोपं असलं की बर पडत, डोक्याला त्रास नाही :)

उगा काहितरीच's picture

22 Apr 2019 - 5:02 pm | उगा काहितरीच

ब्वॉर्र...

दादा कोंडके's picture

22 Apr 2019 - 5:03 pm | दादा कोंडके

आयर्न मॅन, हल्क, स्पायडर मॅन, थॉर, क्लींट बार्टन, कॅप्टन अमेरिका, लोकी, ब्लॅक विडो ही पात्र बघायला आवडतात. जेंव्हा स्टार वॉर्स मधली पात्रं आली तेंव्हा मजा गेली.

जानु's picture

22 Apr 2019 - 5:09 pm | जानु

एक नंबर, चिनार शेठ!!!

मराठी कथालेखक's picture

22 Apr 2019 - 5:37 pm | मराठी कथालेखक

आमच्या ऑफिसमधले आम्ही काहीजण एकदा गार्डीयन ऑफ गॅलक्सी बघायला गेलो होतो.. मला काही झेपलाच नाही आणि डोकं शिणलं ..तर हा चित्रपट सुचवणार्‍यातलेच दोघे उठून मॉलमध्ये फिरायला निघून गेलेत.

बाकी हे सूर्यदेवसिंग कोणत्या चित्रपटातले म्हणायचे ?

अरे ये ब्रिगेडियर को नही जानता... [ ये पी.एस.पी.ओ. नही जानता च्या चालीवर म्हणावे.. ;-) ]
अधिक माहितीसाठी हा धागा पहावा - https://www.misalpav.com/node/24554

आनन्दा's picture

23 Apr 2019 - 10:54 am | आनन्दा

छान चर्चा... जेव्हा काही ज्येष्ठ मिपाकर "मिपा आता पुर्वीचे मिपा राहिले नाही" म्हणतात त्याचा अर्थ हे असे धागे पाहिल्यावर कळतो..

आनन्दा's picture

22 Apr 2019 - 10:00 pm | आनन्दा

जानी... आप सुर्यादेवसिंग को नाही जानते?

महासंग्राम's picture

22 Apr 2019 - 6:26 pm | महासंग्राम

आम्ही साऊथ चे पिक्चर पचवेल माणसं हौ भौ, त्यापूढं एवेन्जर्स वगैरे किस झाड कि पत्ती मियाँ, हमको कूच बी चलता

येक लंबर.. लय भारी चिनारशेठ! :-)

मी आपला हे मार्वल पिक्चर्स - कल्पनाशक्ती, पात्रं आणि विज्युअल इफेक्ट्स साठी पाहतो.
बाकी डोकं बाजूला ठेवून चित्रपट बघायची सवय आपल्याला गोविंदा-धवन प्रवृत्तींनी फार आधीपासून लावून दिलेली आहे.
[अरे कोण म्हणतोय रे की दुल्हेराजा डोकं रिलॅक्स करण्यासाठी ब्येश्ट पिक्चर आहे ते! ;-) ]

जुइ's picture

23 Apr 2019 - 2:28 am | जुइ

एकदम झक्कासं!!

नाखु's picture

23 Apr 2019 - 10:30 am | नाखु

वाचायला मिळाले,नाहीतर असलं न पाहणारा एक क्षुद्र जीवजंतू म्हणूनच आपली संभावना होत राहील हेच शल्य घेऊन रहावे लागले असते.
बाकी डामटी आणि सूर्यदेव यांचे बाबतीत प्रचंड प्रमाणात सहमत.
आणखी एक उपप्रकार म्हणजेच लक्ष्या भरात असताना केलेले आयत्या घरात घरोबा,धान्यवडे पेष्षल सिनेमा.

आकाशगंगा प्रकरणांपासून दूर असलेला नाखु पांढरपेशा

अभ्या..'s picture

23 Apr 2019 - 10:38 am | अभ्या..

आईशप्पथ, कसलं खरतरनाक लिहवलस गड्या, झबरडस्ट.
असले भोकशे पिक्चर(च) पाहणारे आमचे काही तसे चांगले मित्र आहेत. ते मराठी किंवा तत्सम चित्रपट कधीच पाहात नाहीत म्हणे.
बाकी एकाची लागली लॉटरी कि बाकीच्यांची गर्दीत टांगे घालायची सवय हॉलीवूडात पण आहे हे बरे वाटते. किंगकाँग व्हर्सेस गॉडझिला, ममी व्हर्सेस स्कॉर्पिन किंग असल्या कॉम्बीनेशपेक्षा हि लीग म्हनजे मागेल त्याला रोजगार हमी योजना आहे. सिंगल स्पायडरमॅन, सिंगल सुपरमॅन काढायला काय दुखते ह्यांचे?

सोन्या बागलाणकर's picture

23 Apr 2019 - 11:38 am | सोन्या बागलाणकर

खुमासदार लेख!

बाकी हे सगळे सुपरहिरो मूव्हिस हॉलीवूडला आलेल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रतीक आहेत. एका अर्थाने ही सुपरहिरोजची मिसळच म्हणा की!

हर्शरन्ग's picture

23 Apr 2019 - 11:46 am | हर्शरन्ग

हाहा भारी लिहिलंय ...आवडल

चिनार's picture

23 Apr 2019 - 1:50 pm | चिनार

धन्यवाद !

चांदणे संदीप's picture

23 Apr 2019 - 3:09 pm | चांदणे संदीप

मझा आला! =))

Sandy

Nitin Palkar's picture

23 Apr 2019 - 9:13 pm | Nitin Palkar

धमाल! धमाल!! धमाल!! छान लिहिलंयस मित्रा.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 4:12 pm | चौथा कोनाडा

हा ..... हा .... हा ..... !

भारी लिव्हलंय !

ही असली प्रकरणं पैल्या पासूनच झेपत नसल्यांनं आमी आपले अक्षय अन हॅण्डपम्प फेम सनीचे फॅन !
डोल्क्याला ताप नय !
(म्हंजी लक्ष्याचा हा बी सिनेमा आनि बाकीचे गंगाराम छाप सिनेमे आपले आवडते )

आरवी's picture

24 Apr 2019 - 4:20 pm | आरवी

बाकी अस्मादिकांची पण स्थिती सेमच, असली प्रकरणं झेपत नैत ब्वा आपल्याला. सो, पूर्ण सहमत.

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2019 - 5:54 pm | टवाळ कार्टा

लै भारी...बाकी माझी रेंज लक्ष्या ते थेनॉस अशी मोठ्ठी आहे

उगा काहितरीच's picture

25 Apr 2019 - 7:34 am | उगा काहितरीच

शनिवार पहाटे ३ः१० चा शो पण जवळजवळ हाउसफुल आहे सहेब. आहात कुठे ? स्वतः खात्री करून घ्या बुक माय शो वर जाऊन. इनअॉर्बिट मॉल , शनिवार सकाळी ३ः१० .

पुणे मुंबई आणि 2 3 गावे सोडली तर तमाम महाराष्ट्रात कुठल्यातरी इंग्लिश स्पेशल टॉकीजला एखादा शो तोपण हिंदीत चालेल आठवडाभर चालेल आणि उतरेल. आहात कुठे?

नाखु's picture

27 Apr 2019 - 10:37 am | नाखु

ठराविक भागात आणि ठरलेल्या प्रेक्षकांच्या आवडीचा सिनेमा आहे हा.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2019 - 1:08 pm | चौथा कोनाडा

हे म्हंजे, हॅरी पॉटर नविन पुस्तकाच्या वेळी लोकांमध्ये रांग लावण्याची क्रेझ आली होती ते आठवलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Apr 2019 - 4:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे असले काही असते हेच माहित नव्हते.

मी बजाजच्या फटफटीबद्दल काही वाचायला मिळेल या अपेक्षेने आलो होतो. शिर्शक वाचून बुलेट किंवा हार्ले प्रेमीं प्रमाणे एव्हेंजर प्रेमी लोक असतात का? असे वाटले म्हणून मोठ्या उत्सूकतेने धागा उघडला. तर हा शिणूमा निघाला.

आधिच इंग्रजी सिनेमा समजत नाही त्यात असला २५-३० सिनेमांची गूंतागूंत भलतेच अवघड आहे.

त्यापेक्षा आपल्यासाठी दोनभागात आटोपलेला बाहुबलीच ठिक आहे असे वाटले.

पैजारबुवा,

सेम हिअर ! मला वाट्ले की १६० सीसी चे नविन एबीएस व्हर्जन लाँच झाले आहे त्याबददल हा धागा असेल !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2019 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक लिहिलंय. माझं आणि इंग्रजी सिनेमाचं असंच आहे. पण आजूबाजूच्या मित्रांच्या तोंडून सारखं गॉट पाहिलेत का ? नवीन भाग आला का ? आता थेटरात जाऊन ऍव्हेंजर्स एन्ड कधी पाहील असं झालं वगैरे गप्पांचा मला वात येतो. आणि पिच्चरच्या स्टोर्‍या तुम्ही म्हटलं तसं या ग्रहावरुन त्या ग्रहावर सारखं आभाळात विजा चमकाव्यात तशा विजा चमकत असतात. प्रचंड आधुनिक तत्रज्ञानाने भरलेल्या हानामार्‍या. खरं तर हे सर्व सिनेमे लहान मुलांचे पण मोठी माणसं इतकी रमतात तेव्हा गम्मत वाटते. हा सर्व ज्याच्या त्याच्या आनंदाचा भाग आहे. तेव्हा आपण त्यात न पडलेलं बरं. असे समजून या गर्दीला वाट करुन द्यायची.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

3 May 2019 - 9:27 pm | हणमंतअण्णा शंकर...

Alice in wonderland ला सर्वोच्च साहित्यात गणणाऱ्या आणि उतारवयातच/पक्व झाल्यावर ते तसे का आहे हे कळते असं म्हणणाऱ्या जीएंची आठ झाली!!

मुक्त विहारि's picture

27 Apr 2019 - 10:32 am | मुक्त विहारि

चार घटका करमणूक.

असो,

दुनिया रंग रंगिली....

नया है वह's picture

2 May 2019 - 3:09 pm | नया है वह

+१

श्वेता२४'s picture

2 May 2019 - 3:55 pm | श्वेता२४

मस्त लिहीलंय

लेखात मुदलातल्या चुका बर्‍याच आहेत. पण तरीही...

हिंदी, मराठी अथवा इतर सिनेमांसारखं मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स नाहीये. ह्या फिक्शनल युनिव्हर्सचा अवाका फार म्हणजे फारच मोठा आहे. मुळात मागची जवळपास काही दशकं मार्वलची कॅरेक्टर्स कॉमिक्समधून भेटत आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि एकत्र अनेक कथा आहेत.

१० वर्ष आणि २२ सिनेमांमधून आत्तापर्यंतचं मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स साकारलं आहेत. प्रत्येक सिनेमा आणि त्यातल्या घटना एंड गेम च्या दिशेने वाटचाल करत होत्या. सोबत स्टोरीलाईन पुढे न्यायला मार्वलच्या एजंट्स ऑफ शील्ड सारख्या अनेक सिरियल्सही आहेत. इतक्या भव्य प्रमाणावर सगळं जुळवून आणि घडवून आणलेली एकही फ्रँचाईझ सिनेमा इतिहासार घडलेली नाही. आणि अजून नव्या फेज पुढे आहेत.

खरोखरच केविलवाणा प्रयत्न होता विनोदाचा.
पण अगदी टिपिकल मिपा छाप एक "लंबर" "लिव्हलं" आहेस, वगैरे प्रतिसाद पाहिले. आपण अवेनजर्स वगैरे च्या नादी लागत नाही म्हणजे कसे लय भारी, इत्यादी वाचून मिपा अजून होतं तसंच आहे हे लक्षात आलं. असो. अजून काही महिने विश्रांती घ्यावी इथून.

समीरसूर's picture

2 May 2019 - 5:08 pm | समीरसूर

बर्‍याच दिवसांनी मिपावर असं मस्त, खुसखुशीत, हलकं-फुलकं वाचायला मिळालं. मज्जा आली.

बाकी हे खरं आहे. हे सिनेमे मलाही कळत नाहीत आणि मला अशा सिनेमांमध्ये अजिबात रसदेखील नाही. मी एकदाच कुठलातरी 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' १२-१५ वर्षांपूर्वी पाहिला होता. डोकं सुन्न झालं होतं. तेव्हापासून असल्या सिनेमांच्या नादाला मी अजिबात लागत नाही. हॅरी पॉटर, रिंग्ज, हर्निया, एव्हेंजर्स, वगैरे काहीच नाही.

अभ्या..'s picture

2 May 2019 - 6:05 pm | अभ्या..

हर्निया का नार्निया?
बाकी दोन्हीही व्याधीच म्हणा ;)

मी पण अजून ऍव्हेंजर किंवा मार्व्हेलशी संबंधित जवळपास काहीच पाहिलेलं नाही ... फक्त डॉक्टर स्ट्रेंज पाहिला , शेरलॉकचा ऍक्टर आहे तर पिक्चर कदाचित बरा असेल म्हणून पण तो अजिबात म्हणजे अजिबातच आवडला नाही ... कसाबसा संपवला ... पण आधीची पार्श्वभूमी इतिहास वगैरे काही माहीत नसल्यामुळे आवडला नाही असंही झालं असेल कदाचित ... पण एकूणच सिनेमाच्या फोटोंमध्ये ती कॉस्च्युम्स चढवलेली पात्रं पाहिली की लहान मुलांचा सिनेमा आहे असा फील येतो आणि त्या वाट्यालाच जाऊ नये असं वाटतं तेव्हा एवढ्यात तरी मार्व्हेल युनिव्हर्सच्या वाट्याला जाण्याची काही शक्यता नाही .

जेसिका जोन्स मालिका मार्व्हेलच्याच एका कॉमिक वर आधारित आहे ... तिचा एक सिजन पाहिला , 10 एपिसोडचा , छान आहे , मुख्य म्हणजे कॉस्च्युम्स नाहीत आणि अंतराळ गॅलक्सी वगैरे भानगडी नाहीत , साधी क्राईम मालिका प्लस थोडंसं फॅन्टसी एलिमेंट आहे , किलग्रेव्ह ह्या व्हिलनच्या प्रेमात पडायला झालं ..

कंजूस's picture

4 May 2019 - 7:22 pm | कंजूस

कालपरवा स्टारगोल्डवर इन्फिनिटी वॅार लागलेलं.
कन्यकेला ( हेमामालिनी) विलन पकडतो, मग तिचा प्रियकर येतो ( धरमू) मग संवाद संवाद. हेच अमेरिकन चाकूसुऱ्या धरून पाहायचं.
----
तिनचारशे कोटी देणारे भारत, दिलेच.
-----
बाकी 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ला कै बोलायचं नाय. मी पैला नाय पण कुणाचा आवडता हाय हितं.

मध्यंतरा पर्यंत आमची सौ. गाढ झोपली होती.

मुलाने आणि मी चित्रपट आवडीने बघीतला.

आधीच्या सगळ्या भागांची सांगड घालत आणि योग्य तिथे खूलासा करत, चित्रपट बर्‍यापैकी खुलवत ठेवला आहे.

मध्यंतरा नंतर, सिनेमा बघाता-बघता, पॉपकॉर्न खाता-खाता, बायको मुलाकडून एका एका सुपर हीरो आणि हिरॉइन बद्दल माहिती घेत होती.

मला तरी ही चित्रपट मालिका २ कारणांमुळे आवडली.

१. अतिशय उत्तम जाहीरात बाजी.

आणि

२. पैसा वसूल व्हिडिओग्राफी.

ह्या मालिके बद्दल बरेच काही सकारात्मक लिहिता येइल पण टंकाळा आला.

असो,

आमच्या सौ.च्या मते, मुलांच्या साठी आणि कुटुंबासहित सिनेमा बघायचा असेल तर, हा सिनेमा बघायला हरकत नाही.