श्रीगणेश लेखमाला २०१८- प्रास्ताविक

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
13 Sep 2018 - 7:06 am

.

नमस्कार मंडळी!

प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया।।

श्रावण संपत असताना दर वर्षी सर्वांना प्रतीक्षा असते गणरायाच्या आगमनाची आणि त्याबरोबरीने आपल्या मिपाच्या श्रीगणेश लेखमालेची. या वर्षी लेखमालेची संकल्पना 'DIY - अर्थात स्वहस्ते नवनिर्मिती' अशी आहे.

या वर्षीच्या लेखमालेत संकल्पनेला अनुसरून लेख असतीलच, त्याशिवाय गणेशोत्सवाविषयीदेखील लेख आहेत. इतिहासकालीन गणेशोत्सवाचं वर्णन आहे आणि फसलेल्या उपवासाची कहाणीदेखील आहे. तंत्रज्ञ नसूनही मिपाकरांनी केलेल्या तांत्रिक करामती आहेत. मिपाकरांनी स्वतः केलेल्या नवनिर्मितीची उत्तम उदाहरणं आहेत आणि आलेल्या अडचणींवर कल्पना लढवून मात केल्याचे अनुभवदेखील आहेत.

मध्यवर्ती संकल्पनेबरोबरच इतर विषयांवरचे लेखसुद्धा आम्ही आमंत्रित केले होते. मिपाकरांनी आमच्या आवाहनाला आपलेपणाने भरभरून प्रतिसाद दिला. सगळेच लेख उत्तम होते. अर्थात सर्वच लेख लेखमालेत समाविष्ट करणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामधील काही वेचक आणि वेधक लेख घेऊन आम्ही सादर करीत आहोत यंदाची श्रीगणेश लेखमाला.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Sep 2018 - 8:12 am | यशोधरा

गणपती बाप्पा मोरया!

डिआइवाईचा खरा उद्देश जुन्या वस्तू भंगार न फेकता चालू स्थितीत ठेवणे हा आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू नवीन तंत्रज्ञान आले की वापरात राहात नाहीत. उदाहरणार्थ क्यासेट प्लेअर. पण त्यामधला स्पिकर वापरात ठेवता येतो.

प्रचेतस's picture

13 Sep 2018 - 9:00 am | प्रचेतस

लेखांची वाट पाहात आहेच.

मिपालाही वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुषार काळभोर's picture

13 Sep 2018 - 9:29 am | तुषार काळभोर

आतुरता बाप्पाच्या आगमनाची...
उत्सुकता श्रीगणेश लेखमालेची...

स्वाती दिनेश's picture

13 Sep 2018 - 11:06 am | स्वाती दिनेश

मंगलमुर्ती मोरया!
लेखांची वाट पाहत आहे,
स्वाती

पद्मावति's picture

13 Sep 2018 - 11:38 am | पद्मावति

पुढचे दहा दिवस लेखांची मेजवानी असणार आहे. मस्तच.

ज्योति अळवणी's picture

13 Sep 2018 - 5:56 pm | ज्योति अळवणी

लेखांची वाट पाहाते आहे

मदनबाण's picture

13 Sep 2018 - 10:13 pm | मदनबाण

ॐ गं गणपतये नमः
उपक्रमास हार्दिक शुभेच्छा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदक वळु लागला , माझा बाप्पा हा नाचु लागला ! :)